Glossary term: सॅजीटेरीअस A* (Sgr A*)
Description: आकाशगंगेच्या केंद्राभोवती तारे आणि वायूच्या हालचालींचे निरीक्षण पृथ्वीपासून सुमारे 27,000 प्रकाश-वर्षे अंतरावर असलेल्या, सूर्याच्या सुमारे 4.5 दशलक्ष पट वस्तुमान असलेल्या आणि 40 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या, सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलचा अप्रत्यक्ष पुरावा देतात. सॅजीटेरीअस A* (सॅजीटेरीअस A-star) हा एक कॉम्पॅक्ट रेडिओ स्त्रोत आहे जो अतिमॅसिव्ह ब्लॅक होलशी संबंधित आहे. हे रेडिओ तरंगलांबीच्या श्रेणीमध्ये पाहिले गेले आहे. सॅजीटेरीअस हे नाव पृथ्वीवरून पाहिल्याप्रमाणे धनु राशीच्या नक्षत्रात स्थित असल्यामुळे, A हे अक्षर आहे कारण ते नक्षत्रात सापडलेला सर्वात तेजस्वी आणि पहिला एक्स्ट्रासोलर(सूर्यमालेबाहेरचा) रेडिओ स्रोत आहे, आणि कारण भौतिकशास्त्रात उत्तेजित अवस्थेतील अणू हे * याने दर्शविले जातात. आणि Sgr A* हा एक रोमांचक शोध होता.
2022 मध्ये, इव्हेंट होरायझन टेलिस्कोप कोलॅबोरेशनने Sgr A* शी संबंधित ब्लॅक होलच्या छायचित्राची पहिली प्रतिमा प्रसिद्ध केली.
Related Terms:
See this term in other languages
Term and definition status: The original definition of this term in English have been approved by a research astronomer and a teacher The translation of this term and its definition is still awaiting approval
The OAE Multilingual Glossary is a project of the IAU Office of Astronomy for Education (OAE) in collaboration with the IAU Office of Astronomy Outreach (OAO). The terms and definitions were chosen, written and reviewed by a collective effort from the OAE, the OAE Centers and Nodes, the OAE National Astronomy Education Coordinators (NAECs) and other volunteers. You can find a full list of credits here. All glossary terms and their definitions are released under a Creative Commons CC BY-4.0 license and should be credited to "IAU OAE".
If you notice a factual or translation error in this glossary term or definition then please get in touch.
Related Diagrams
Sagittarius Constellation Map
Credit: Adapted by the IAU Office of Astronomy for Education from the original by IAU/Sky & Telescope
License: CC-BY-4.0 Creative Commons Attribution 4.0 International (CC BY 4.0) icons