Loading...

Glossary term: उंची

Description: उंचीचे दोन अर्थ आहेत: ते एकतर विशिष्ट प्रकारच्या समन्वय प्रणालीमध्ये एक विशिष्ट कोन (""ताराची उंची"") दर्शवते किंवा दिलेल्या संदर्भ पातळीशी संबंधित अनुलंब अंतर दर्शविते (""समुद्राच्या पातळीपासून 5000 मीटर"").

खगोलशास्त्र (आणि सर्वेक्षण) मध्ये, तथाकथित क्षैतिज समन्वय प्रणालींमध्ये उंची एक कोन आहे. तो कोन क्षितिजाच्या वर एखादी वस्तू किती उच्च आहे हे मोजतो - जर आपण आपले बोट तय वसतुकडे निर्देशित केले आणि नंतर त्या बोटाला सरळ खाली क्षितिजापर्यंत आणले तर आपल्या हाताची दिशा उंचीच्या कोनातून बदलली असेल. उंची एकतर डिग्री किंवा रेडियनमध्ये मोजली जाते. क्षितिजावरील ऑब्जेक्टची उंची ०° असते आणि थेट डोक्यावर असलेल्या वस्तूची म्हणजेच ""झेनिथ येथे"" असलेल्या वस्तूची उंची ९०° असते. नकारात्मक उंची ही सध्या क्षितिजाच्या खाली असलेल्या वस्तूंना नियुक्त केली जातात - तेथे, उंचीचे कोन ऑब्जेक्ट क्षितिजाच्या खाली किती दूर आहे हे मोजतात. आपल्या पायाच्या खाली असलेल्या वस्तू म्हणजेच ""नादिर येथे"" असलेल्या वस्तूची उंची –९०° असते.

इतर संदर्भांमध्ये, जसे की विमानचालन किंवा वातावरणीय भौतिकशास्त्र, यांच्यात उंची म्हणजे काही विशिष्ट संदर्भ पातळीपेक्षा किती उच्च स्थान आहे हे मोजण्यासाठी वापरतात. पृथ्वीवर, उंची ही बर्‍याचदा समुद्राच्या पातळीवरची उंची म्हणून दर्शवली जाते. या अर्थानुसार, मीटर सारख्या लांबीच्या युनिटमध्ये उंची मोजली जाते.

Related Terms:



See this term in other languages

Term and definition status: The original definition of this term in English have been approved by a research astronomer and a teacher
The translation of this term and its definition is still awaiting approval

The OAE Multilingual Glossary is a project of the IAU Office of Astronomy for Education (OAE) in collaboration with the IAU Office of Astronomy Outreach (OAO). The terms and definitions were chosen, written and reviewed by a collective effort from the OAE, the OAE Centers and Nodes, the OAE National Astronomy Education Coordinators (NAECs) and other volunteers. You can find a full list of credits here. All glossary terms and their definitions are released under a Creative Commons CC BY-4.0 license and should be credited to "IAU OAE".